छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या
महाराष्ट्र भूमीमध्ये एकूण लोकसंख्येच्या 30 ते 35 टक्के आपला मराठा समाज हा विविध भागात विखुरलेला आहे. प्रथमपासूनच
मराठा समाज हा शेती व त्या संबधीत व्यवसायावर अवलंबून होता. एकूण मराठा समाजापैकी 75% मराठा समाज अशिक्षित असल्यामुळे
मूळ गावी शेती व 25% शिक्षित समाज हा नोकरी व विविध व्यवसाय / उद्योगधंदे यावर अवलंबून होता. परंतु जसजसा काळ पुढे
सरकत गेला तसतसे शिक्षणाचे महत्त्व कळून हळूहळू मराठा समाजाने शिक्षणाची कास धरून महाराष्ट्रच नव्हे, देश नव्हे तर
जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाने स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सहाजीकच आर्थिक विकासासोबत मराठा समाज
हा आपल्या इतर नातेवाईक व मराठा बांधवांपासून दूर झाला. याचाच परिणाम घरातील मुले मुलींच्या लग्नासाठी चांगली स्थळे
मिळवण्यात अडसर निर्माण होऊ लागला. यामुळे रोजच्या सामाजिक, कौटुंबिक संवादामुळे जे विवाह लगेच जमायचे ती आता होत
नाहीत. आज आपल्या मराठा समाजामध्ये कितीतरी उच्चशिक्षित तरुण-तरुणी, शेतकरी, तरुण व्यावसायिक यांचे विवाह जमण्यास
खूप विलंब होत आहे. एकूणच या परिस्थितीमुळे घरातील वडिलधारी मंडळी व स्वतः वधु वर हे ते निराशेच्या गर्देत
सापडलेले आहेत. याचाच गैरफायदा काही समाजातील घटक घेत आहेत व अत्यंत चुकीच्या रूढी परंपराचा पायंडा पडत आहे.
यासाठीच एक मराठा लाख मराठा या समाज भावनेचा आदर करून मराठा समाजाचे आपणही काही देणे लागतो व
सामाजिक जबाबदारीतून मराठा समाजाचे ऋण फेडावे या उद्देशाने आम्ही शिवशाही वधू वर सूचक केंद्राच्या माध्यमातून
www.shivshahimarriage.com ही वेबसाईट सुरू केलेली आहे.
जसे जुन्या काळी जातीवर आधारित आरक्षण घेणे म्हणजे कमीपणाचे लक्षण, ही खोटी समजूत मनाशी ठेवून
आपल्या पूर्वीच्या पिढीने आरक्षणाचा लाभ घेतला नाही. त्यामुळे भावी पिढीला गुणवत्ता असूनसुद्धा त्यांच्या
शैक्षणिक व नोकरीच्या संधी गमावल्या गेल्या आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विवाह संस्थेत नाव नोंदवणे म्हणजे
कमीपणा अशी भावना मनात ठेवून बहुतेक मराठा समाजातील वडीलधारी मंडळी आपले मुला-मुलींचे लग्नासाठीचे नोंदणी
ही वधुवर सुचक कार्यालयांमध्ये करत नाहीत व आपले जवळचे नातेवाईक किंवा ओळखीचे यांच्यामार्फत येणाऱ्या
स्थळांशी विवाह संबंध जुळवतात. त्यामुळे आपल्या मुला मुलींच्या शारीरिक, शैक्षणिक व सामाजिक योग्यतेनुसार
आवडीचे जोडीदार मिळत नाहीत व एक प्रकारे त्यांच्या भावी सुखी आयुष्यावर आपण अन्याय करतो. तरी जुन्या
अनुभवानुसार आपल्या मुला मुलींच्या उज्वल वैवाहिक भविष्य साठी आपण आमच्या वेबसाईटवर नाव नोंदवावे जेणेकरून
त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याच्या संधी गमावू नये हीच एक आपणास विनंती आहे. आपल्या मुलाबाळांच्या योग्यतेनुसार
चांगली स्थळ मिळवण्याकरता व त्यांची माहिती देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. त्यात आपली सर्वांची साथ मोलाची आहे.
आपल्या सूचनांचे आम्ही स्वागत सदैव करतो.