Rules and Payment

शिवशाही वधु वर सुचक केंद्राच्या संकेतस्थळा संबधीत नियम व अटी
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र ही फक्त मराठा समाजातील वधू-वरांच्या साठी नाव नोंदणी करण्यात येते.
  • वधू वरास नाव नोंदणी करता संकेतस्थळावर आपली संपूर्ण वैयक्तिक, कौटुंबिक, जन्म कुंडली, शैक्षणिक, व्यावसायिक आणि उत्पन्नाशी संबंधित तसेच आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा यांची माहिती, स्वतःचे फोटो व आयडी कार्ड (आधार कार्ड) अपलोड करावी लागतात.
  • वधू-वरांनी नाव नोंदणी करताना शक्यतो घरातील जबाबदार वडीलधाऱ्या मंडळींचा व्हाट्सअप अथवा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा. वधुंनी कृपया स्वतःचा व्हाट्सअप नंबर देणे टाळावे.
  • संपूर्ण माहिती फोटो व आयडी कार्ड अपलोड झाल्यानंतर मोबाईल नंबर व इमेल आयडी व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्यानंतर आपणास एक प्रोफाइल आयडी दिला जातो.
  • आपण दिलेला मोबाईल क्रमांक हा आपला लॉगीन आयडी असेल. या लॉगीन आयडी व पासवर्ड द्वारे आपण आपणास पसंत असलेल्या स्थळांची माहिती घेऊ शकता
  • पुढील प्रत्येक वेळेस संकेतस्थळावर भेट देताना आपणास आपणास पसंत असलेल्या स्थळांची माहिती ई-मेल द्वारे मिळू शकेल. त्यासाठी आपण आपला इमेल आयडी व मोबाईल क्रमांक देताना तो बरोबर देत आहोत याची काळजी घ्यावी. पसंत स्थळांची माहिती व्हाट्सअप द्वारे सुद्धा मिळेल पण त्या करता आपणास अतिरिक्त शुल्क भरावे लागतील.
  • सर्व वधू-वरास विनंती आहे की संकेतस्थळावर दिली जाणारी माहिती ही कृपया खरी / सत्य भरावी. आपण अपलोड केलेल्या माहितीमध्ये काही असत्य निघाल्यास होणाऱ्या कारवाईस संबधित वधू अथवा वर जबाबदार राहतील. व त्यांना संकेतस्थळावर ब्लॉक केले जाईल.
  • वधू-वरांनी फोटो अपलोड करताना कृपया दोन पोस्ट कार्ड साईज फोटो अपलोड करावेत. त्यातील एक फोटो हा क्लोजअप असावा व दुसरा फोटो हा संपूर्ण असावा. फोटो अपलोड करतांना शक्यतो मोबाईल वरील विविध फिल्टर वापरून काढलेले फोटो वापरू नये. स्वच्छ प्रकाशात नॉर्मल मोड मध्ये काढलेले फोटो वापरावेत.
  • नोंदणीकृत सभासदांना इतर पसंत असलेल्या माहिती भेटण्याकरता त्या स्थळांचे प्रोफाईल आयडी ची रिक्वेस्ट संकेतस्थळावर द्यावी लागेल
  • एका आठवड्यातून जास्तीत जास्त आपणास सात स्थळांचे माहिती दिली जाईल.
  • शिवशाही वधुवर सुचक केंद्राचे काम हे फक्त आपणास वधू आणि वर यांच्या विषयी माहिती पुरवण्याचे आहे. नोंदणीकृत वधू-वरांनी पसंत असलेल्या स्थळाची घरगुती, कौटुंबिक, शैक्षणिक, व्यावसायिक व इतर माहिती स्वतः व इतर नातेवाईक, मित्र मंडळी कडून खातर जमा करून घ्यावी व त्या नुसार पूर्ण चौकशी आणि पूर्ण विचार करूनच पुढील लग्नाचा निर्णय घ्यावा. भविष्यात वधू वरांच्या आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शिवशाही वधुवर सुचक केंद्र जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र वर आपण विवाह नोंदणी केल्यानंतर ठराविक दिवसातच आपले लग्न जमेल अथवा इतकेच पसंतीचे स्थळे मिळतील याची आम्ही खात्री देत नाही.
  • नोंदणीकृत वर केवळ वधूच्या तपशीलांची विनंती करू शकतो आणि नववधू केवळ वरच्या तपशीलांसाठी विनंती करू शकतात.
  • संकेतस्थळावर असलेल्या कोणत्याही वधू-वरांच्या माहितीचा फोटोचा अथवा इतर माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा केला जाईल.
  • ज्या वधू-वरांना आपली माहिती व फोटो हे संकेतस्थळावर अपलोड करण्यास अडचण येत असं त्यांनी शिवशाही वधू वर सूचक केंद्राच्या येथे पोस्टाने माहिती पाठवून नाव नोंदणी करू शकता.
  • संकेतस्थळावर अपलोड केलेली माहिती आपण इंटरनेटच्या माध्यमातून जगात कुठेही पाहू शकता. त्यामुळे दरवेळी आपणास आमच्या शिवशाही वधुवर सुचक केंद्र संपर्क साधण्याची गरज नाही.
  • वधू-वरांनी कृपया आपले लग्न जमल्यानंतर अथवा मुदत संपल्यानंतर आमच्या केंद्राशी संपर्क साधावा जेणेकरून संकेतस्थळावरून आपले प्रोफाईल आयडी ब्लॉक केले जातील व त्यांच्या संबधित माहिती संकेतस्थळावरून काढता येईल.
  • नोंदणी करता आपला आधार लिंक मोबाईल नंबर व आधार कार्ड चे फोटो अपलोड करणे हे बंधनकारक आहे. आपल्या मोबाईल नंबर व इमेल च्या व्हेरिफिकेशन शिवाय आपली माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार नाही व आपणास इतरांची ही माहिती पाहता येणार नाही
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र च्या संकेतस्थळावरील सर्च ऑप्शन मधून आपण वधू-वरांची उंची शिक्षण वय व्यावसायिक माहिती मुळगाव इत्यादी फिल्टर लावून प्रोफाईल आयडी शोधता येतात. त्यात काही अडचण आल्यास आपण आमच्या केंद्राशी फोन अथवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधू शकता
  • शिवशाही वधुवर सुचक केंद्र यांच्या संकेतस्थळावरील गुण मिलन द्वारे आपण वधू-वरांचे पत्रिका किती गुण जुळतात याची माहिती मिळते परंतु सदर माहिती ही आपण आपल्या ज्योतिषाकडून खातरजमा करून घ्यावी
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र च्या संकेतस्थळावरील सर्च ऑप्शन मधून आपण वधू-वरांची उंची शिक्षण वय व्यावसायिक माहिती मुळगाव इत्यादी फिल्टर लावून प्रोफाईल आयडी शोधता येतात.
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र च्या संकेतस्थळावरील नोंदणीचे व पसंत असलेल्या स्थळांची माहिती व संपर्क क्रमांक मिळवण्याचे दर खालील प्रमाणे आहेत.
माहिती फी / शुल्क (रुपये) वैधता / जास्तीत जास्त संपर्क क्रमांक विनंती
संकेतस्थळावरील नोंदणी शुन्य अमर्यादित कालावधी
पसंत असलेल्या स्थळांची माहिती व संपर्क क्रमांक शुन्य पहिल्या अकरा स्थळांसाठी
मर्यादित मोफत पहिल्या अकरा स्थळांचे नंतर दर खालील प्रमाणे असतील
पसंत असलेल्या स्थळांची माहिती व संपर्क क्रमांक 750.00 25
पसंत असलेल्या स्थळांची माहिती व संपर्क क्रमांक 1,250.00 60
पसंत असलेल्या स्थळांची माहिती व संपर्क क्रमांक 2,000.00 150
  • पसंत असलेल्या स्थळांची माहिती ई-मेल द्वारे वरील शुल्कात मोफत दिली जाते परंतु जर आपणास पसंत असलेल्या स्थळांची माहिती व्हाट्सअप द्वारे हवी असेल तर आपणास अतिरिक्त शुल्क रुपये 100.00 भरावे लागतील.
  • शिवशाही वधु वर सुचक केंद्र च्या संकेतस्थळा संबधीत आपल्या सूचना व तक्रारींचे आम्ही स्वागत करतो. आपल्या सूचना व तक्रारी आपण आम्हास फोन, इमेल अथवा व्हाट्सअप द्वारे कळवू शकता.